आटपाडी तालुक्यातील रस्ते कामांना ४० कोटीचा निधी : आम. गोपीचंद पडळकर
सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण होणार : दळणवळणाला येणार गती
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा प्रश्न निकाली निघणार असून, रस्ते कामांना तब्बल ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
यामध्ये निंबवडे वाक्षेवाडी-झरे रस्ता, हिवतड ते काळेवाडी ते तळेवाडी रस्ता, मासाळवाडी ते माडगुळे रस्ता, विठलापूर ते खवासपूर रस्ता जिल्हा हद्द पर्यंत, लेंगरेवाडी ते शेटफळे चिंद्यापीर रस्ते, झरे ते मानेवस्ती रस्ता, शेंडगेवाडी ते कामाथ रस्ता या रस्ते कामांना ४० कोटी २० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर झाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून वरील सर्व गावांतील नागरिकांना येत असलेल्या अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे झरे, विठलापूर, शेंडगेवाडी, वाक्षेवाडी, हिवतड, काळेवाडी, तळेवाडी, मासाळवाडी, माडगुळे, येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील काही वर्षांपासून रस्ते दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबित होता. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचे आभार मानले आहेत.