आटपाडीताज्या बातम्या
आटपाडी : शेटफळेच्या सुरेखा गायकवाडचे एमपीएससीत यश
यापुर्वी सुरेखा हिने मंत्रालय सहाय्यक परीक्षेतही यश मिळविले होते.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील सुरेखा विलास गायकवाडने Surekha Gaikwad लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. तिची पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर निवड झाली आहे.
शेटफळे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुरेखा गायकवाड हिचे प्राथमिक शिक्षण शेटफळे येथे झाले. तर बारामतीतून बीएस्सीची पदवी घेतली. इस्लामपूर येथे तिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास केला. कोणत्याही क्लास शिवाय तिने स्वयंअध्ययानावर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली.
यापुर्वी सुरेखा हिने मंत्रालय सहाय्यक परीक्षेतही यश मिळविले होते. तिच्या यशाबद्दल शेटफळेसह आटपाडी तालुक्यातून कौतुक होत आहे.