आटपाडीताज्या बातम्या
आटपाडी : शेटफळेत पाण्यात बुडून महिलेचा मृत्यू

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत शेटफळेचे पोलीस पाटील यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मिनाबाई बाळासो मोरे वय 60 वर्षे, रा. शेटफळे या शेटफळे गावातील पाटील मळा येथील ओढापत्रात पाण्यात पडून बुडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गावाचे पोलीस पाटील दत्तात्रय क्षीरसागर यांनी आटपाडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.