आटपाडीताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्रसांगली
शिवाजी पॉलिटेक्निक मध्ये महिला दिन साजरा

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील शिवाजी पॉलिटेक्निक आटपाडी मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आटपाडी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वृषाली पाटील या उपस्थित होत्या.
यावेळी त्यांनी स्त्री आणि पुरुष समाज व्यवस्थे बाबत तसेच, मुलींनी शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योग्य आहार व व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. महाविद्यालायचे प्राचार्य ओंकार कुलकर्णी यांनी, स्त्रियांची अनादिकालापासूनची थोरवी ऐतिहासिक उदाहरणासह स्पष्ट केली. यावेळी, प्रा. शिवदास टिंगरे व प्रा. आशा संकपाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. रोहित पवार, सूत्रसंचालन सचिन खडसरे तर आभार प्रा. विनायक रायचुरे यांनी मानले.