आटपाडीताज्या बातम्या
प्रा. दत्तात्रय जाधव यांचे अकस्मित निधन
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे कार्यरत असलेले प्रा. दत्तात्रय जाधव यांचे आज दिनांक ०४ रोजी सकाळी अकस्मित निधन झाले.
प्रा. दत्तात्रय जाधव हे आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय येथे कार्यरत होते. त्यांची तब्येत खालवली असल्याने गेली तीन ते चार दिवस झाले त्यांच्यावर सांगली येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरु होते.
परंतु आज दिनांक ०४ रोजी सकाळी ६.०० च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे निधानाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.