viral vedioपुणेमनोरंजन

पुणेकरांचा विषयच हार्ड! “येथे कचरा टाकणाऱ्याची बायको…” कचरा टाकणाऱ्यांना दिली थेट धमकी; पाटी वाचून पोट धरुन हसाल

Puneri pati: पुणेरी पाट्या हा वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला विषय आहे. पुणेकरांच्या या पुणेरी पाट्या जितक्या वाचायला मजेशीर असतात तितक्याच त्या खोचकपणे चांगला संदेश देऊन जातात. पुणेकरांची शान असलेली ही पाटी अनेकदा लोकांचा अपमान करते; पण नियम म्हणजे नियम आणि याचे पालन केलेच पाहिजे, असा धडा शिकवून जाते.पुणेरी पाट्यांचा जरा विशेष थाटच आहे. या पाट्या फक्त पुण्यातच नाहीतस तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पुणेकऱ्यांच्या या पाटीचं कौतुक तर अनेक जण करतात; पण त्याच्यावर अनेकदा टीकाही होते.

 

 

 

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्याेपासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारी एक पुणेरी पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तुम्ही अनेकदा दुकानाबाहेरील पाटी, भिंतीवर लावलेली पोस्टर्स पाहिले असतील. पण, सध्या रस्त्यावर लावलेली एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

 

 

 

 

पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात रस्त्यावर लावली होती. या पाटीवर कचरा टाकणाऱ्यांना अशी धमकी दिली आहे की पाटी वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल.ही पाटी वाचून कोणी चूकूनही कचरा टाकायची हिम्मत नाही करणार. आता तुम्ही म्हणाल या पाटीवर असं लिहलंय तरी काय? तर या पाटीवर “येथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये ही नम्र विनंती ” व जाणून बुजून कचरा टाकणाऱ्याची बायको पळून जाईल, आई वेडी होईल, बाप भिकारी होईल आणि मुले सिग्नलवर लिंबू मिरची विकतील.”

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button