Viral Video : तरुणाने सादर केली जबरदस्त लावणी, अदा अन् हावभाव पाहून कोणीही थक्क होईल, व्हिडीओ एकदा पाहाच

लावणी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. लावणी या महाराष्ट्रीयन नृत्य कलेने अख्ख्या जगाला वेड लावले आहे. सहसा महिला लावणी नृत्य सादर करतात पण अलीकडे पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी नृत्य सादर करताना दिसतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अप्रतिम अशी लावणी सादर करताना दिसत आहे. या तरुणाची लावणी पाहून कोणीही थक्क होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक स्टेज दिसेल. हा स्टेज यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठातील आहे. या स्टेजवर एक तरुण अप्रतिम अशी लावणी सादर करताना दिसत आहे. तरुणाने महाराष्ट्रीयन नऊवारी आणि मराठमोळे दागिने घातलेले आहे. हा तरुण नऊवारी नेसून लावणी सादर करत आहे. चंद्रा या लोकप्रिय गाण्यावर तो लावणी सादर करताना दिसत आहे. त्याच्या प्रत्येक डान्स स्टेप्स आणि हावभावावर लोक टाळ्या वाजवत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
त्याच्या या लावणी नृत्यावर अनेक युजर्सनी लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.