ताज्या बातम्यासांगली
तासगाव : निमणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अविनाश गुरव निलंबित
शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई : झिरो शिक्षक नेमणे आले अंगलट
माणदेश एक्सप्रेस न्यूज : तासगाव : तासगाव तालुक्यातील निमणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अविनाश बाळासो गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी स्वतःच्या जागी शाळेत झिरो शिक्षकाची नेमणूक केली होती.
शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या निदर्शनास हा प्रकार आला होता. त्यामुळे गुरव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांनीही शिक्षणाधिकारी गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती.
याप्रकरणी केंद्र प्रमुख किसन चौगुले यांनाही निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर व झालेल्या प्रकाराला मूक संमती देणे त्यांना भोवले आहे. शिवाय सहाय्यक शिक्षिका दीपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समितीलाही नोटीस बजावण्यात आली होती.