Video : खासदार विशाल पाटील व माजी खा. संजयकाका पाटील यांच्यात जोरदार राडा
तासगांव नगरपालिकेच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी वादावादी
माणदेश एक्सप्रेस न्युज /तासगांव/प्रतिनिधी :
माजी खासदार संजय काका पाटील व विद्यमान खासदार विशाल पाटील यांच्यात तासगाव येथे तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जोरदार बाचीबाची झाली. यावेळी मोठा गोंधळ उडाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात तासगाव मधील रिंग रोडच्या श्रेय वादावरून खासदार विशाल पाटील व संजय काका पाटील यांच्यात वादावादी खाली. संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेत केली कडक शब्दात टीका केली.
तासगाव रिंग रोडचे श्रेय खासदार विशाल पाटील यांनी युवा नेते रोहित पाटील यांना, संजय काकांनी माईक वरून सुनावले.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासमोर ही वादावादी झाली. यावेळी तासगाव कवठेमंकाळच्या आमदार सुमनताई पाटील देखील होत्या. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
पहा Video