आटपाडीताज्या बातम्यामहाराष्ट्रसांगली
जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये पेन्शन द्या

अर्थक्रांती जेष्ठ नागरीक संघटनेचे आम. पडळकर यांना निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : ६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये दरमहा मानधन देण्याच्या मागणीचे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांना देण्यात आले. तसेच आटपाडी शहरामध्ये विरंगुळा केंद्राची मागणी देखील करण्यात आली.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जेष्ठ नागरिक संघटनेचे अरविंद चांडवले, भास्करराव गायकवाड, हणमंत राक्षे, बाळासाहेब गायकवाड मेजर, बजरंग हाके, दत्तात्रय मोकाशी, सुरेश कासार तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी.जाधव सर उपस्थित होते.