आटपाडीचे रणजीतसिंह पाटील ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित
खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते त्यांना सदरचा पुरस्कार देण्यात आले.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे सुपुत्र ‘रक्षक ग्रुप ऑफ कंपनीज्’ चे प्रमुख रणजीतसिंह पाटील यांना माणदेश फौंडेशनच्या वतीने ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खानापूर-आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते त्यांना सदरचा पुरस्कार देण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकशेठ मासाळ, युवा नेते दत्तात्रय पाटील पंच, पोपट पाटील पंच, दिघंची सरपंच अमोल मोरे, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब होनराव, शहाजीबापू जाधव, माणदेश फाऊंडेशनचे गुलाब पाटील सर, बाजीराव पाटील सर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रणजीतसिंह पाटील हे ‘रक्षक ग्रुप ऑफ कंपनीज्’ चे प्रमुख असून, त्यांनी विविध उद्योगक्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील ‘रक्षक ग्रुप’ विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. ज्यामध्ये सुरक्षा सेवा, व्यवसाय व्यवस्थापन, स्कूल व पर्यावरणपूरक उपक्रम यांचा समावेश आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर ते म्हणाले, ‘यशस्वी उद्योजक’ पुरस्कार मिळाल्याने कर्तृत्वाची पावती मिळालेली आहे. यामुळे उद्योगाचा विस्तार, नाविन्यपूर्ण कामगिरी, आणि रोजगार निर्मिती यामध्ये मोठ्या प्रमाणत काम करण्यास संधी मिळणार असून, या पुरस्कारामुळे कर्तृत्ववान नवउद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे.