“या” स्टार क्रिकेटरच्या बहिणीचं आज लग्न, जाणून घ्या कोण आहे ती आणि तिचा होणारा पती?

भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत याची मोठी बहीण साक्षीचं बुधवारी म्हणजेच मसूरीमधील सेवाय हॉटेलमध्ये अंकित चौधरी याच्यासोबत लग्न होणार आहे. लग्नाचे रितीरिवाज कालपासूनच सुरू झाले. मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम मंगळवारी पार पडला.
साक्षी आणि तिचा होणारा पती एकमेकांना गेल्या ९ वर्षापासून ओळखतात. आता हे कपल लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ऋषभची बहीण साक्षीचा होणारा पती अंकित चौधरी लंडनमध्ये बिझनेसमॅन आहे. साक्षी पंत आणि अंकित चौधरी यांचा साखरपुडा गेल्यावर्षी लंडनमध्ये झाला होता. साक्षीचं शिक्षण यूकेमध्येच झालं असून ती सोशल मीडियावर चांगलीच फेमस आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. लग्नाचे सगळे कार्यक्रम मसूरीमध्ये होणार आहेत. या लग्न सोहळ्याला जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारातील लोकांना बोलवण्यात आलं आहे.
ऋषभ पंतच्या लग्नात सहभागी होण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पत्नी साक्षीसह मसूरीला पोहोचला. त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच आयसीसीचे अध्यक्ष जय शाहसहीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि टीममधील इतरही खेळाडू सुद्धा लग्नाला पोहचणार असल्याची चर्चा आहे.