शिवसेनेच्या एकनाथ शिंदे सरकार मध्ये राहिलेल्या “या” मंत्र्यांना मिळणार डच्चू
माणदेश एक्सप्रेस न्युज : नागपूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला विस्तार आज नागपूर येथे संपन्न होणार आहे. या सरकारमध्ये भाजपचे २० शिवसेनेचे १० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. ज्यांना फोन गेले आहेत, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित समजला जात आहे. परंतु मागील शिंदे सरकारमध्ये असलेल्या अनेक ज्येष्ठांना अजूनही फोन गेले नाही. त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या नेत्यांना घरी बसवण्यात आल्याची शक्यता आहे.
यामध्ये प्रामुख्याने गुवाहाटीची जबाबदारी घेणाऱ्या डॉ. तानाजी सावंत यांनाच एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळ देण्यात आलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपमधून त्यांच्या नावाला प्रचंड विरोध होत असल्याने त्यांचे नाव शिवसेनेला मंत्री मंडळातून वगळावे लागले आहे.
त्याच बरोबर छत्रपती संभाजीनगर मधून शिवसेनेकडून मंत्री राहिलेले अब्दुल सत्तार यांचा देखील पत्ता कट करण्यात आलेला आहे. भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या पराभवाला त्यांनी मोठा हातभार लावल्याने त्यांच्या देखील नावाला भाजपमधून विरोध असल्याने त्यांना देखील फडणवीस सरकारमधून डच्चू देण्यात आलेला आहे.
तसेच गुवाहाटी गेलेल्या गटाची भूमिका समाजमाध्यमातून लावून धरणारे दीपक केसरकर यांच्या देखील नावाला भाजप मधून तसेच प्रामुख्याने नारायण राणे कुटुंबांकडून त्यांना प्रचंड विरोध असल्याने त्यांचे देखील नाव नाईलाजाने एकनाथ शिंदे यांना कट करावे लागले आहे.
मंत्रिमंडळात या नावांची शक्यता
एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल