सांगलीत “या” दिवशी एमपीएससी ची संयुक्त पूर्व परीक्षा
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सन-2024 ही दि. 1 डिसेंबर 2024 रोजी सांगली, सांगलीवाडी येथील एकूण 24 हायस्कूल / महाविद्यालयांच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजीचे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिंना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परीक्षा वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.
परीक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे –
सिटी हायस्कूल, गावभाग, सांगली, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विश्रामबाग, सांगली, श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट टिळकनगर, वानलेसवाडी, मिरज, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगलीवाडी, सांगली हायस्कूल सांगली, मोहम्मदिया अँग्लो उर्दु उच्च विद्यालय व कला व विज्ञान शालेय कनिष्ठ महाविद्यालय, सांगली, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली, विलिंग्डन कॉलेज, विश्रामबाग, सांगली, राणी सरस्वती कन्या स्कूल, पेठ भाग, सांगली, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल, शिवाजीनगर, सांगली, सौ. लक्ष्मीबाई पांडुरंग पाटील विद्यालय सांगलीवाडी, जी. ए. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, हरभट रोड, सांगली, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, विश्रामबाग, सांगली, गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली, मातोश्री गंगामा शिवाजी कोठारी गुजराथी विद्यालय आणि ज्यु. कॉलेज, महावीरनगर, सांगली, प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाळा, विश्रामबाग, सांगली, सौ. के. बी. दमाणी हायस्कूल, चांदणी चौकाजवळ, सांगली, सांगली हायस्कूल व श्री. विनोद शिवाजी भाटे आर्टस्, सायन्स व कॉमर्स ज्यु. कॉलेज, आमराईजवळ, सांगली, मातोश्री सायराबाई चंपालाल बेथमुथाज्यू कॉलेज, रिसाला रोड, खणभाग, सांगली, श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, नेमिनाथनगर, सांगली, कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला, गणेशदुर्ग, राजवाडा, सांगली, हि. हा. रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, गणेशदुर्ग, राजवाडा, सांगली.
हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.