जयंत पाटलांचा खरा चेहरा जनतेसमोर आला ; भाजपच्या सांगली जिल्हाध्यक्ष यांची प्रतिक्रिया
जयंत पाटील यांनी एका मेडिकल कॉलेजवर छापा आणि त्या कॉलेजवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितले होते,असा आरोप केला होता.
माणदेश एक्सप्रेस न्युज : सांगली : माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर आरोप केले होते. जयंत पाटील यांनी एका मेडिकल कॉलेजवर छापा आणि त्या कॉलेजवर गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितले होते,असा आरोप केला होता. यावर ज्या मेडिकल कॉलेजचा परमवीर सिंग यांनी उल्लेख केला त्या प्रकाश मेडिकल कॉलेजचे संस्थापक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील (Nishikant Patil) यांची प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.
निशिकांत पाटील काय म्हणाले?
निशिकांत पाटील म्हणाले, सुसंस्कृत, शांत विचारांचा मुखवटा परिधान केलेल्या जयंत पाटलांचा मुखवटा आता गळून पडला असून त्यांचा मूळ चेहरा आता जनतेसमोर आला आहे. राजकीय द्वेषपोटी अनेक कुटुंबे उद्धवस्त केली. त्यांच्या संस्था संपवू पाहणाऱ्या या आमदारांना यापुढील राजकारणातून हद्दपार करण्यासाठी क्रांतीकारक मातीतील मतदार पुढे येतील.
परमबीर सिंह काय म्हणाले होते…
परमबीर सिंह म्हणाले, राजकीय विरोधकांवर कारवाईसाठी दबाव आणला जात होता. गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला गेला होता. अनिल गोटे, चव्हाण, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत त्यांनी माझ्यावर दबाव आणला, मी नकार दिला. 2020 मधील हा प्रकार आहे.
जयंत पाटील यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. प्रविण दरेकर यांच्यावर देखील कारवाईसाठी दबाव होता. परंतु मी राजकारणासाठी पोलिस विभागाचा वापर होऊ दिला नाही. ठाण्यात माझ्या विरोधात बोगस केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्या केसमध्ये फडणवीस आणि माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, असे परमबीर सिंह म्हणाले.