धनगर आरक्षण बाबत उद्या आटपाडी येथे रास्ता रोको : विष्णू अर्जुन
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही : पडळकर
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे याबाबत आटपाडी येथे उद्या दिनांक २३ रोजी सकाळी १०.०० वाजता आण्णाभाऊ साठे चौक येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती आटपाडी बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन यांनी दिली.
धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण (Dhangar Reservation) मिळावं यासाठी 23 तारखेला राज्यभर रास्ता रोको (rasta roko) करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली. यासाठी सर्वांनीएकत्र यावं असं आवाहन पडळकरांनी धनगर समाजाला केले होते. सरकारमध्ये जरी असलो तरी आधी मी समाजाचा असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. आदिवासी समाज आरक्षणाबाबत गरज नसताना जर आक्रमक होत असेल तर धनगर समाज सुद्धा आपली ताकद येत्या सोमवारी दाखवेल असं पडळकर म्हणाले होते. त्यामुळे आटपाडी येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे विष्णू अर्जुन म्हणाले.
मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन
मी सरकारमध्ये जरी असलो तरी सरकारच्या विरोधात आंदोलन करत असली तरी, प्रथम मी समाजाचा असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. सरकार सगळ्या बाबतीत सकारात्मक आहे, मी तशा प्रकारची कागदपत्र सुद्धा सरकारकडे दिली आहेत. शासन निर्णय करताना कधी कुठली प्रोसेस आहे या सगळ्या बाबतची माहिती आम्हाला समितीकडून मिळाली असल्याचे पडळकर म्हणाले. आदिवासी नेते आणि काहीजण मुद्दामून सरकारवर जीआर निघू नये यासाठी दबाव टाकत आहेत. आम्ही आदिवासी नेत्यांना विनंती करतो की आमच्या सोबत आणि सरकार सोबत चर्चा करा असे पडळकर म्हणाले.
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही : पडळकर
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. हे आम्ही लिहून दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत, त्यानुसार एसटीमध्ये वर्ग करून आम्हाला आमचं आरक्षण मिळणार आहे. आदिवासी नेते जर म्हणत असतील आम्ही पाणी कट करू, रूळ उखडून टाकू तर आम्ही सुद्धा मागे राहणार नाहीत असंही पडळकर म्हणाले.
धनगड व धनगर या शब्दामुळे समाज आरक्षणापासून वंचित
1980 पासून धनगर समाजाच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती. धनगर समाज हा अनुसूचित जमातीत असून केवळ धनगड व धनगर या शब्दामुळे स्वातंत्र्यापासून हा समाज आरक्षणापासून वंचित राहिल्याचा दावा आंदोलन करीत आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती द्या, या मागणीला तसेच स्वातंत्र्यापासून सुरुवात झाली असली तरी 1980 पासून या आंदोलनाने वेग घेतला. निवडणुकीच्या तोंडावर अनेक वेळा सर्वच पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली.