आटपाडी शहरात उद्या तब्बल १२३ कोटी रुपयांच्या कामांचा उद्घाटन सोहळा : दत्तात्रय (पंच) पाटील

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये उद्या दिनांक १३ रोजी तब्बल १२३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा होणार असून चार कोटी रुपयांच्या कामांचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न होणार असल्याची माहिती युवा नेते दत्तात्रय पाटील (पंच) यांनी दिली.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, संचालक अमोल बाबर यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. आटपाडी शहरासाठी ८३ कोटी रुपयांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन कोर्टाजवळ होणार आहे.
दोन कोटी रुपयांच्या आटपाडी ओढा पात्र संरक्षण भिंत कामाचे उद्घाटन ग.दि.माडगुळकर नाट्यगृहाशेजारी होणार आहे. आटपाडी-पांढरेवाडी रस्ता ८.५ कोटी रुपयांचे उद्घाटन पांढरेवाडी रस्ता सांगोला चौक येथे संपन्न होणार आहे. तर आटपाडी व्यापारी पेठेतील मुख्य रस्त्याचे लोकार्पण व साई मंदिर चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक रस्ता उद्घाटन नगरपंचायत जवळ होणार आहे.