आटपाडी : ‘धनगाव योजना’ बाबत सुरु असलेले मनसेचे आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आश्वासनानंतर स्थगित
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्याला शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी ‘धनगाव योजना’ सरकारने मंजूर केली होती. सदर योजनेवर आज पर्यंत १०० कोटी खर्च करून अद्याप ही पूर्ण झाली नसल्याने मनसेचे जिल्हा सचिव राजेश जाधव यांनी आटपाडी तहसीलदार कार्यालयावरती सुरु केलेले आंदोलन आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
यावेळी बोलताना राजेश जाधव म्हणाले, धनगाव योजनेवर 100 कोटी रुपये खर्च झाले तरी ही योजना का रखडली ? ती लवकरात लवकर पूर्ण करावी. सत्तेसाठी सर्व नेते एकत्र येत असतात मग लोकहिताच्या या प्रश्नावर राजकारण का करता? सामान्य जनतेच्या खिशाला कात्री का? दुषीत पाण्यामुळे अनेक आजारांनी लोकं ग्रासली जातात नेत्यांना स्वतः च्या स्वार्थापलिकडे जनतेचे काहीच देणे घेणें उरले नाही ,असा आरोप राजेश जाधव यांनी सर्वच नेत्यांवर केला.
आटपाडी तहसीलदार कार्यालय येथे उपोषण सुरू असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उप अभियंता प्रियांका माने यांनी उपोषण स्थळीं भेट देत, सदर योजना मा. उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट असल्याची माहिती देत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली त्यानंतर माने मॅडम यांचे हस्ते जाधव यांनी उपोषण स्थगित केले.
यावेळी स्वाभिमानी वंचितचे अरुणभाऊ वाघमारे, मनसे शेतकरी सेनेचे प्रकाश गायकवाड, शंकर मोरे, रोहीत सावत, दीपक राक्षे, अतुल गायकवाड, डॉ.उन्मेष देशमुख, दिगंबर मोरे, जयंत गायकवाड , संभाजी पाटील, जीवन पोळ, तानाजी नांगरे, शिवराम मासाळ. आदी मान्यवर उपस्थित होते.