आटपाडीक्राईमताज्या बातम्या

आटपाडी : जिल्हा बँक अपहर प्रकरणी एकाला अटक ; एक तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारूण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली होती.

माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नेलकरंजी शाखेत झालेल्या अपहर प्रकरणी प्रतिप गुलाब पवार (रा. करगणी) याला आटपाडी पोलिसांनी अटक केली. त्याला १ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल ४८ लाख ८८ हजार ३७८ रूपयांच्या अपहार प्रकरणी जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा बँकेचा कॅशिअर, ज्यु. सहायक आणि शिपाई अशा तिघांचा यात समावेश होता.

 

आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत सुमारे ४९ लाखाच्या अपहार प्रकरणी मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे (रा. तळेवाडी), प्रतिप गुलाब पवार (रा. करगणी) आणि दिगंबर पोपट शिंदे (रा.नेलकरंजी) या तिघांवर जुलै महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

बँकेचे तालुका विभागीय अधिकारी व वसुली अधिकारी हारूण रज्जाक जमादार यांनी फिर्याद दिली होती. जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेतील ज्युनिअर सहायक प्रतिप पवार याने प्रमुख कॅशिअर मच्छिंद्र म्हारगुडे यांच्याकडील पासवर्डचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गोलमाल केल्याची बाब निदर्शनास आली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात आल्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई केली.

 

मच्छिंद्र म्हारगुडे, प्रतिप पवार आणि दिंगबर शिंदे या तिघांनी संगनमताने बँकेचा विश्वासघात करून खातेदारांच्या कागदपत्रांचा गैरवापर केला. नवीन खाती काढुन नॉन ऑपरेटिव्ह खात्यांचा वापर करून त्यातील ४८ लाख ८८ हजार ३७८ रूपये अन्य खात्यांमध्ये वळते केले. आरटीजीएस करून सदरची रक्कम एटीएमव्दारे काढण्यात आली. रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक चलन व व्हाऊचर न करता पासवर्डचा गैरवापर करून ऑगस्ट २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.

 

नेलकरंजीतील शाखेच्या तपासणीमध्ये ही बाब उजेडात आल्यानंतर याबाबतचा अहवाल बैंकेकडे देण्यात आला. तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी या प्रकरणाचा तपास आटपाडी पोलीस करत होते. नंतर तो आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सुचनेनुसार पुन्हा तपास आटपाडी पोलीसांकडे आला. उपनिरीक्षक केंद्रे व सहकाऱ्यांनी अपहार प्रकरणातील प्रतिप पवार याला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. (स्रोत : तरुण भारत)

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button