आगामी खानापूर विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीने लढणार : ब्रम्हानंद पडळकर
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : खानापूर मतदार संघातील आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टी म्हणून ताकतीने लढवणार असल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ब्रम्हानंद पडळकर म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका आता पार पडल्या आहेत. आता यापुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बाबत राजकीय रणनीती आखण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या पडळकर गटात खानापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक नेतेमंडळी , कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. अनेक जण येण्यास इच्छुक आहेत. आम्ही कधीच आडवा आडवीचे राजकारण केले नाही. नेहमीच विकासाचे व कार्यकर्ते जोडण्याचे काम केले आहे. भाजपात येणाऱ्या सर्व कार्यकर्ते यांचे आम्ही स्वागत करू त्याचा मान सन्मान ठेवण्याचे काम आम्ही केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत विधानसभेची निवडून लढवली व मोठ्या मताधिक्याने जिंकली. असल्याने या विजयाने कार्यकर्ते मोठे उत्साहित झाले आहेत. आता खानापूर विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुकासाठी अद्याप वेळ असला तरी, त्याची तयारी पडळकर गटाने आता पासूनच करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी पत्रकार परिषदे नंतर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी जाधव, बाजार समितीचे माजी संचालक विष्णूपंत अर्जुन, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सरगर, आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत दौंडे, चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन राहुल सपाटे, अनिल सूर्यवंशी, दिघंचीचे प्रणव गुरव, कैलास वाघमारे, चंद्रकांत काळे, जगनाथ खटके, शशिकांत मोरे, चंद्रकांत पावणे, गणेश भुते, यशवंत मेटकरी, आबासाहेब भानवसे, बाळू जेडगे, सागर चवरे, राजू हाके, भगवान दाईगडे, विकास भुते, उपस्थित होते.
विटा नगरपालिका, खानापूर नगरपंचायत, आटपाडी नगरपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये होणाऱ्या निवडणुका ताकतीने लढवण्यासाठी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यात आले.