शरद पवार गटाचे आणखी 9 उमेदवार जाहीर ; खानापूर मतदार संघामध्ये अजूनही सस्पेंस कायम
माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई/प्रतिनधी : २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिसरी उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. या यादीत एकूण 9 उमेदवारांचा समावेश आहे. परंतु या यादीमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदार संघातील उमेदवाराची अद्याव घोषणा झाली नसल्याने, या मतदार संघामध्ये अजूनही सस्पेन्स कायम आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. आता तिसऱ्या यादीत ९ जणांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या उमेदवारांमध्ये बीडमधील परळी मतदारसंघात धनंजय मुडेंच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आला आहे. तर मुंबईतील अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती फहद अहमद यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार
वाशिम कारंजा – ज्ञायक पाटणी चिंचवड – राहुल कलाटे माजलगाव – मोहन जगताप परळी – राजेसाहेब देशमुख हिंगणा – रमेश बंग अणुशक्तीनगर – फहद अहमद मोहोळ – सिद्धी कदम भोसरी – अजित गव्हाणे हिंगणघाट – अतुल वांदिले