श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना 20 % पगारवाढ ; दिग्विजय देशमुख
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना 20 % पगारवाढ दिली असल्याची माहिती दुध संघाचे संचालक दिग्विजय देशमुख यांनी दिली.
यावेळी बोलताना दिग्विजय देशमुख म्हणाले, श्रीमंत बाबासाहेब देशमुख दूध संघांची स्थापना सन 2007 साली झाली. सुरुवातीला आटपाडी येथे सुमारे 600 लिटर प्रतिदिन संकलनावर सुरु झालेला दूधसंघ जिल्हा परिषदेचे मा, अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे नेतृत्वाखाली आज आटपाडीसह जत, विटा, पंढरपूर या ठिकाणी विस्तारत गेला आहे.आज दूध संघामार्फत प्रतिदिन सुमारे 1,00,000 (एक लाख) लिटर दूधा संकलन होत आहे.
दूध संघात 284 सेंटरमार्फत संकलित होणाऱ्या दूधाच्या दूध उत्पादकांना दर दहा दिवसाला दूध बिलाचे पैसे न चुकता जमा करण्याची परंपरा दूधसंघाने स्थापनेपासून जपली आहे. त्यामुळे संघाला दूध घालणाऱ्या सुमारे 19763 दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच शासनाकडून दूध उत्पादकांना मिळणाऱ्या प्रतिलिटर 5/- रुपये अनुदानाची रक्कम सुमारे दोन कोटी रुपये आजपर्यंत उत्पादकांचे खातेवर जमा झाले आहेत. त्यामुळे संघास गाय दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय दूधाचा दर प्रतिलिटर 35/- रुपये मिळत आहे.
दूध संघामार्फत सध्या पेढा, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, ताक, दही, फ्लेवर मिल्क, खवा, लस्सी, पनीर इत्यादी उत्पादने तयार होत असुन परीसरामध्ये त्यांना चांगली मागणी होत आहे. संघाच्या जडणघडणीत संघाचे मॅनेजर अशोक दौंड व सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांच्या योगदानाचा विचार करुन दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना 20% पगारवाढ देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. त्याचबरोबर संघ स्थापनेपासून दिवाळीसाठी प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांना 25% बोनस दिला जातो.