बहुजनांचा बुलंद आवाज आता राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदावर
माणदेश एक्सप्रेस न्युज/नाशिक : माळवाडी ता.देवळा जिल्हा नाशिक येथील भूमिपुत्र, शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने तशा निवडीचे पत्र शुक्रवार (ता.१८) रोजी त्यांना मिळाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा.गोसावी यांनी या पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून भूमिका सिद्ध केली. या पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन ही निवड झाली असल्याचे पत्रात म्हटले आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरीत्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने इतक्या मोठ्या पदावर निवड केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचे शिक्षण पूर्ण करत यशवंत गोसावी यांनी स्वतःला घडवले आणि त्यानंतर शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यभरातील आई-वडील नसणाऱ्या अनाथ मुलांना सांभाळायचं काम मागील बारा वर्षापासून त्यांनी सुरू केलं. आज रोजी त्यांच्या ट्रस्टकडे 128 अनाथ मुल असून त्यांचा संगोपन यशवंत गोसावी हे करतात आणि अशा सामान्य कुटुंबातील असामान्य काम करणाऱ्या माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या काळात स्टार प्रचारक म्हणून आणि आज आणि विधानसभेच्या काळात महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जी जबाबदारी दिली ती नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील माणसाचा गौरव करणारी आहे
लोकनेते शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रत्नपारखी आहेत आणि या जोडीने यशवंत गोसावी यांना बरोबर हेरलं आणि या माणसाने त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील गरिबाच्या मुलाचं एवढा मोठा पद देऊन सन्मान केल्याबद्दल सर्वत्र त्यांचा अभिनंदन होत आहे