ताज्या बातम्यामहाराष्ट्रसांगली

‘म्हैसाळ’ योजनेच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी 200 मेगावॅट क्षमतेच्या 1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना केली.

 

 

नुकतीच, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे योजनेसाठी लागणाऱ्या दरवर्षी सुमारे ३९८ दशलक्ष युनीट वीजेची गरज भागवली जाणार आहे. म्हैसाळ सिंचन योजनेचा उद्भव कृष्णा नदीवर म्हैसाळ येथे आहे. येथून विविध टप्प्यांमध्ये २३.४४ अब्ज घनफूट पाणी उचलून त्याद्वारे सांगली जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगांव, जत व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला व मंगळवेढा या तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

 

 

 

कृष्णा नदीचे पाणी मिरज शहराजवळील म्हैसाळ येथून उचलून एकूण सहा टप्प्यांमध्ये कार्यन्वित आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढ्यापर्यंत जाते. विविध ठिकाणी एकूण सहा वेळा पाण्याचा उपसा करावा लागतो. त्यामुळे म्हैसाळ योजनेला दरवर्षी सुमारे २५ कोटी रुपयांचे वीजबिल येते. या वीजबिलाची वसुली पाणीपट्टीद्वारे होत नाही. त्यामुळे वीजबिल भरले नाही म्हणून योजना बंद पडण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी निधी किंवा टंचाई निधीतून वीजबिल भरून योजना सुरू ठेवली जात होती. हा वीजबिलाचा वाढता खर्च भागविण्यासाठीच सौर ऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button