क्रीडाताज्या बातम्या

Paris Olympics : भारतीय हॉकी संघाचा ‘ग्रेट’ विजय ; विजयाने भारताची उपांत्य फेरीत मुसंडी !

भारताच्या विजयाचा शिल्पकार गोलकीपर श्रीजेश ठरला. त्याने भक्कम बचाव करून ग्रेट ब्रिटनच्या एकामागून एक होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावले

Paris Olympics 2024 Hockey : पॅरिसमध्येही भारताने ग्रेट ब्रिटनला पराभवाची धूळ चारून ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या विजयाचा शिल्पकार गोलकीपर श्रीजेश ठरला. त्याने भक्कम बचाव करून ग्रेट ब्रिटनच्या एकामागून एक होणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावले. अवघ्या 10 खेळाडूंच्या जोरावर भारताने अविश्वनिय बचाव केला. ज्यामुळे सामना पूर्णवेळेत 1-1 असा बरोबरीत राहिला. परिणामी पेनल्टी शॉट्सवर सामन्याचा निकाल लागला. ज्यात भारताने 4-2 ने विजय मिळविला.

पहिल्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने आक्रमक सुरुवात केली. ज्यामुळे भारताला बाचावात्मक पवित्रा घेणे भाग पडले. यादरम्यान ब्रिटनला 4 थ्या आणि 5 व्या मिनिटादरम्यान तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण भारतीय गोलकीपर श्रीजेश आणि बचावफळीने शानदार खेळ करून आक्रमण परतवून लावले. त्यानंतर भारताने पलटवार करत ब्रिटनच्या डीमध्ये धडक मारली. क्वार्टर संपायला दोन मिनिट शिल्लक असताना भारतालाही सलग तीन पेनल्टी कॉर्नरच्या मिळाले. पण भारतीय खेळाडूंना गोलजाळे भेदता आले नाही. अखेर हा क्वार्टर गोलशून्य बरोबरीत सुटला.

भारतासाठी दुसऱ्या क्वार्टच्या सुरुवातीलाच मोठा झटका बसला. अमित रोहिदासला 17 व्या मिनिटाला लाल कार्ड देण्यात आले. ब्रिटीश खेळाडूच्या चेहऱ्याला स्टीक लागल्याने त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले. ज्यामुळे भारताला 10 खेळाडूंसोबत झुंज द्यावी लागली. ब्ल्यू आर्मीनेही पुढे आक्रमकता हाच बचाव रणनितीचा अवलंब केला आणि ब्रिटनच्या डीमध्ये मुसंडी मारली. परिणामी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला.

 

या संधीचा भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने फायदा उठवला. त्याच्या अचूक फटल्याने गोलजाळे भेदले. 22 व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली. हरमनप्रीतचा पॅरिस ऑलिम्पिकमधला हा 7 वा गोल ठरला. भारताची आघाडी अल्पकाळ ठरली. 27 व्या मिनिटाला ब्रिटनने कौटर ॲटॅक करून बरोबरी साधली. त्याच्या ली मॉर्टनने गोल नोंदवला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button