ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं सरकारविरोधात आंदोलन; अर्थसंकल्पावर नाराजी

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केल्याची टीका होत आहे. तर, हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असल्याचं सरकारमधील मंत्र्यांचं व आमदारांचं म्हणणं आहे.
आज विधीमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकते. यावर आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह झटका मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.