आटपाडीताज्या बातम्या

आटपाडी : दिघंची हायस्कूलच्या पर्यवेक्षिका यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी :  दिघंची येथील दिघंची हायस्कूलच्या  पर्यवेक्षिका जयश्री देशमुख यांचा म्हसवड नजीक झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती रामचंद्र देशमुख हे देखील या अपघातातून बचावले असून, ते जखमी झाले आहेत.

 

रामचंद्र निवृत्ती देशमुख (वय ६०, निवृत्त शिक्षक) आणि त्यांची पत्नी जयश्री रामचंद्र देशमुख (वय ५२, रा. आटपाडी) हे चारचाकी गाडीने (MH10CH3624) पुण्याहून आटपाडीकडे येत होते. म्हसवड जवळ वाण्याची झाडी येथे रामचंद्र देशमुख यांना झोपेची डुलकी लागली, त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या सेफ्टी रेलिंगला जोरदार धडकली.

 

अपघात इतका भीषण होता की, सेफ्टी रेलिंग गाडीच्या पुढील बाजूत घुसून, जयश्री देशमुख यांच्या पोटात घुसले, त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या दुर्देवी घटनेने देशमुख कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button