मराठा सराफ असोसिएशनच्या वतीने आम. गोपीचंद पडळकर यांचा सत्कार
सर्व गलाई बांधवांनी दोन्ही भावांच्या पाठीमागे ताकदीने उभ राहण्याचा शब्द दिला.
माणदेश एक्सप्रेस न्युज : सातारा : गलाई बांधवांच्या अडचणीच्या मुळापर्यंत जाऊन सोडवून घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती या सर्व समस्या घालून लवकरच या विषयावर मोठे जन आंदोलन उभा करण्याचे आश्वासन आम. गोपीचंद पडळकर यांनी गलाई बांधवाना दिले.
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सातारास्थित सराफ व्यवसायिकांनी, मराठा सराफ असोसिएशन साताराच्या वतीने पार्टे रिसॉर्ट, सातारा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये सराफ व्यवसायिकांच्या अडचणीवर, औचित्याचा मुद्दा मांडल्याबद्दल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व गलाई बांधवांनी दोन्ही भावांच्या पाठीमागे ताकदीने उभ राहण्याचा शब्द दिला.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर जिल्हा सचिव पंकज दबडे, विद्यार्थी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील, ज्येष्ठ नेते माणिक काका शिंदे, साळशिंगेचे सुशांत शेठ पवार, आबासो जाधव, सातारा सराफ असोसिएशन अध्यक्ष सुजित जगताप भाग्यनगर,विकास हासबे पाटील हिवरे, गणेश शेठ सुर्वे खंबाळे, पांडू नाना गिड्डे तडवळे, अनिकेत शेठ पवार वासुंबे, प्रवीण शेठ कटरे कटरेवाडी, हरिदास शेड इंगळे देवनगर, जयदीप शेठ रावताळे घानवड, रवी शेठ पवार घरनिकी, अक्षय शेठ चव्हाण तडवळे, सुजित कुमार जगताप भाग्यनगर, वैभव शेठ साळुंखे मांजर्डे, नामदेव शेठ गिड्डे तडवळे, विकास शेठ पवार वासुंबे, निलेश शेठ इंगळे देवनगर, अजय शेठ सावंत घानवड, आबा भोसले बेनापुर, दिनकर शेठ मंडले खानापूर, अरविंद गायकवाड गोरेवाडी, अतुल शेठ बेरगळ बेरगळवाडी, विशाल शेठ कटरे कटरेवाडी, अभिजीत दिलीप जगताप भाग्यनगर, शिवाजी जगताप भाग्यनगर, हेमंत शेठ जगताप सांगोले, सुनील पाटणकर भाग्यनगर, प्रशांत शेठ गिड्डे तडवळे, श्रीकांत शेठ देशमुख धोंडेवाडी, सुशांत शेठ चव्हाण चिखलहोळ, जयदीप शेठ जगदाळे भेंडवडे, तेजस शेठ पाटील यपाची वाडी यांच्यासह मोठ्या संख्येने तालुक्यातील सराफ व्यवसायिक उपस्थित होते.