मोबाईल घ्यायचा आहे, बजेट 20 हजार आहे, तुमच्या बजेटमध्ये ‘हे’ फोन आहेत तुमच्यासाठी उत्तम पर्याय ! कमी पैशात फोनमध्ये मिळतील भन्नाट वैशिष्ट्ये
मीत कमी किंमत आणि चांगली वैशिष्ट्ये असणारा स्मार्टफोन तुमच्यासाठी सजेशन करत आहोत.
कुठलीही वस्तू बाजारामध्ये घ्यायला जातो तेव्हा कमीत कमी किमतीमध्ये चांगली वस्तू कशी मिळेल हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रयत्न असतो. हीच बाब आपण स्मार्टफोन बाजारात घ्यायला गेलो तर त्याला देखील लागू होतो. त्यामुळे आम्ही तुमच्या बजेटमधील किंमत म्हणजेच कमीत कमी किंमत आणि चांगली वैशिष्ट्ये असणारा स्मार्टफोन तुमच्यासाठी सजेशन करत आहोत.
हे आहेत वीस हजार रुपये पेक्षा कमी किमतीचे स्मार्टफोन
- वनप्लस नॉर्ड CE4 Lite 5G- हा वनप्लसचा एक उत्तम असा स्मार्टफोन असून त्यामध्ये 6.67 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये पन्नास मेगापिक्सलचा कॅमेरा असून सेल्फी साठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5100 mAh क्षमतेची बॅटरी असून ती 80W चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची रॅम ही आठ जीबी असून स्टोरेज 256 जीबीचा आहे. हा फोन तुम्हाला सुपर सिल्वर आणि मेगा ब्लु कलर पर्यायमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
- रेडमी नोट 13 5G- या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून या फोनची बॅटरी क्षमता ही 5000mAh असून ती 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.
या फोनचा डिस्प्ले हा 6.67 इंच एमोलेड प्रकारचा असून जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 6080 चिपसेट वापरण्यात आलेला आहे. हा फोन तुम्हाला ग्रफाईट ब्लॅक, आर्केटिक व्हाईट आणि ओसियन टिल इत्यादी कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- सॅमसंग गॅलेक्सी M35 5G- सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6000 mAh बॅटरी देण्यात आलेली असून जास्त स्मार्टफोनचा वापर असणाऱ्या व्यक्तींसाठी हा फोन खूप उत्तम आहे. स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आलेला असून मागच्या पॅनलवर ट्रिपल कॅमेरा युनिट देण्यात आला आहे
व ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. या फोनची बॅटरी 6000mAh क्षमतेची असून ती 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन डार्क ब्लू आणि लाईट ब्लू वगैरे या कलर मध्ये उपलब्ध आहे.
- नथिंग CMF फोन 15G- या फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून पावरकरिता यामध्ये 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे
व सेल्फी करिता 16 मेगापिक्सल सेंसर देण्यात आला असून हा स्मार्टफोन तुम्हाला काळा तसंच नारंगी आणि हलक्या हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनची रॅम आठ जीबीची असून स्टोरेज 256 जीबीची आहे.
- मोटोरोला मोटो G85- हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असून फोन यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलेली असून जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
या स्मार्टफोनची रॅम ही 12GB ची आहे व स्टोरी 256 जीबीची आहे. त्यामध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा व त्यासोबत आठ मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आलेला आहे.