संत्र्याच्या सालीपासून बनवा फेस टोनर, डार्क स्पॉट्स होतील कमी, त्वचा उजळण्यास होईल मदत…

संत्री ही केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सि़डंट्स आणि इतर पोषक घटक आढळतात. जे त्वचा उजळण्यास, मुरुमे कमी करण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात.
आपल्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स, पिंपल्स किंवा सुरकुत्या असतील तर संत्र्याच्या सालीचे टोनर फायदेशीर राहिल. यामुळे त्वचेवरील डाग, काळपटपणा कमी होईल. तसेच त्वचा चमकदार ठेवण्यास मदत होईल. संत्र्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून बचाव करतात. अकाली येणाऱ्या वृद्धत्वापासून आपल्याला वाचवतात. संत्र्याच्या सालीपासून फेस टोनर कसा बनवायचा पाहूया. उन्हाळ्यात घामामुळे त्वचा लाल-रॅशेस- पुरळ येतात, सतत खाज सुटते? ५ घरगुती उपाय, त्रास होईल कमी
साहित्य
संत्र्याची सुकवलेली साल
गुलाब पाणी किंवा कोरफड जेल
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
मिक्सर
फेस टोनर बनवायचे कसे?
1. सगळ्यात आधी संत्र्याची साल धुवून कोरड्या जागी ठेवा. २ ते ३ दिवस सुकत ठेवा. साल पूर्णपणे सुकल्यानंतर त्याची बारीक पावडर तयार करा.
2. तयार पावडर चाळणीतून चाळून घ्या. यामुळे सीरमची पोत अधिक गुळगुळीत होईल. लहान भांड्यात संत्र्याच्या सालीचा पावडर, त्यात थोडे गुलाब पाणी आणि कोरफड जेल घाला.
3. पेस्ट घट्ट होईपर्यंत मिसळवत राहा. यामध्ये आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला, ज्यामुळे त्वचेला पोषण मिळेल.
4. तयार केलेले सीरम स्वच्छ आणि कोरड्या बाटलीत ठेवा. ही सीरम १ ते २ आठवडे वापरता येईल.
5. सीरम वापरण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. १५ ते २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.
कमी वयातच त्वचा लूज पडली?; त्वचा घट्ट करण्यासाठी ५ प्रभावी उपाय, दिसाल अधिक तरुण
सीरमचे फायदे…
संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमीन सी असते ज्यामुळे त्वचेची चमक सुधारण्यासाठी याचा फायदा होतो.
यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे छिद्र स्वच्छ करण्यास आणि मुरुमे कमी करण्यास मदत करतात. गुलाब पाणी आणि कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवते.