माडगुळेकरांच्या प्रेमाच्या शिदोरीने सुहासभैय्या झाले भावूक

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यावर खानापूर आटपाडीच्या जनतेने अपार प्रेम केले. भाऊंच्या 1990 च्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी नागरिकांनी जमेल तशी लोकवर्गणी गोळा करून त्यांच्याकडे दिली होती. स्वर्गीय अनिलभाऊंचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांना देखील तेच प्रेम मिळत असल्याची प्रचिती आज दिसून आली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील ग्रामस्थांनी सुहास भैयांच्या निवडणुकीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. अन् स्वर्गीय भाऊंच्या आठवणीने संपूर्ण कार्यकर्ते व स्वतः सुहास भैया भावूक झाले.
स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सुहास भैया बाबर हे प्रथमच विधानसभेच्या आखाड्यात उतरत असताना भाऊंच्या पहिल्या निवडणुकीची आठवण व्हावी असा प्रसंग घडला. सुहास भैयांना आज माडगूळे येथील ग्रामस्थांनी 51 हजार रूपयांचा धनादेश देऊन मदतीचा हातभार दिला आहे.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, या मतदार संघाने आम्हा बाबर कुटुंबीयावर अतोनात प्रेम केले ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. स्वर्गीय भाऊंच्या पश्चात सर्वसामान्य जनतेने आम्हाला प्रचंड आपुलकी आणि पाठबळ दिले आहे. आमदार अनिल भाऊंनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत जनतेची सेवा केली. त्याच पावलावर पाऊल ठेवून मी जनतेशी कधी प्रतारणा करणार नाही. आपण दिलेली रक्कम ही माझ्या दृष्टीने एक आयुष्याची शिदोरी आहे. मी माझ्या राजकीय आयुष्यात हे प्रेम कदापि विसरू शकणार नाही असे भावनिक उद्गारही सुहास भैया बाबर यांनी यावेळेस काढले.
यावेळी तुषार विभुते, सौरभ विभुते, अमोल विभुते, सतीश विभुते, निशांत विभुते, वसंत विभुते, बाबुराव विभुते, एन.बी.विभुते, रमेश नसले, महेश लिंगडे, सोमनाथ विभुते, किशोर जावीर, प्रसाद गुरव, सचिन कुंभार आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : आटपाडी : माडगुळे येथील नागरिकांनी सुहास बाबर यांना निवडणुकीसाठी 51 हजार रुपयांचा धनादेश दिला. यावेळी उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील व उपस्थित मान्यवर