माडगुळे पंचायत समिती गणात दादासाहेब मोटे सर यांचा विजय निश्चित : नवनाथशेठ ऐवळे
माडगुळे पंचायत समिती गणात आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत.

माणदेश एक्सप्रेस न्यूज / आटपाडी / प्रतिनिधी : माडगुळे पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दादासाहेब मोटे सर यांचा विजय निश्चित असल्याची ठाम प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नवनाथशेठ ऐवळे यांनी व्यक्त केली आहे. दादासाहेब मोटे सर यांचा आजवरचा राजकीय, सामाजिक व शैक्षणिक प्रवास पाहता मतदारांचा त्यांच्याकडे असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
माडगुळे पंचायत समिती गणात आजपर्यंत भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर तसेच स्वतः दादासाहेब मोटे सर यांनी सरपंचपदाच्या काळात बोंबेवाडी गावाचा आदर्श विकास घडवून आणला. रस्ते, पाणीपुरवठा, सामाजिक सभागृहे, शैक्षणिक सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या विकासकामांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना झाला आहे.
दादासाहेब मोटे सर हे उच्च शिक्षित, अभ्यासू व समाजातील प्रत्येक घटकांशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व आहे. युवकांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा त्यांचा निर्धार आहे. तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराला चालना देणे यावर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे नवनाथशेठ ऐवळे यांनी सांगितले.
एकंदरच विकासाची ठोस कामगिरी, स्वच्छ प्रतिमा व जनतेशी थेट संपर्क या बळावर माडगुळे पंचायत समिती गणातून दादासाहेब मोटे सर यांचा विजय निश्चित असून, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन नवनाथशेठ ऐवळे यांनी मतदारांना केले आहे.




