राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या दुसऱ्या यादीत खानापूर ‘वेटिंग’ मध्येच
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : राज्यातील निवडणुका जाहीर झाल्या असून आतापर्यंत भाजप कडून दोन वेळा उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. काँग्रेस, अजित पवार गट यांनी ही दोन वेळा उमेदवार जाहीर केले असून, शिवसेना उबाठा कडून तिसरी यादी जाहीर झाली आहे. खानापूर मतदार संघामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून स्व. अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
खानापूर मतदार संघ हा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा कडून यापैकी नेमका कोणाला सुटणार हे अद्याप समोर आले नाही. राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली असून, शिवसेनेचे तिसरी यादी जाहीर झाली आहे. परंतु यामध्ये खानापुर मतदार संघातून अद्याप कोणालाही उमेदवार जाहीर झाली नसल्याने उमेदवाचा सस्पेंस कायम आहे.
महायुती मध्ये खानापूर मतदार संघ हा शिंदे शिवसेनेला सुटला आहे. या ठिकाणी शिंदे सेनेकडून जिल्हा परिषदे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार सुद्धा सुरु केला आहे. महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यापैकी मतदार संघ कुणाला मिळणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे.
विट्याचे नगराध्यक्ष व अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले वैभव पाटील यांनी निवडणूक लढविण्यासाठी अजित पवार गटाला रामराम करत, शरदचंद्र पवार गटात प्रवेश करत उमेदवारीवर दावेदारी केली होती. परंतु भाजपचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी भाजपला सोडचिट्ठी देत उमेदवारीचा शब्द घेत, राष्ट्र्वादीच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. वैभव पाटील व राजेंद्रआण्णा देशमुख हे दोन्ही लढण्यास ठाम असल्याने उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे.
तर आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यास ठाम असल्याने त्यांनी मतदार संघामध्ये गावभेट दौरे करत, उमेदवारी भक्कम केली आहे. त्यामुळे सध्या तरी सुहास बाबर व ब्रम्हानंद पडळकर यांची उमेदवारी पक्की असून वैभव पाटील, राजेंद्रआण्णा देशमुख की सदाशिवराव पाटील यांच्यापैकी उमेदवारी कुणाला मिळते यावर पुढील लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.