‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी आहे’, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ
बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीपर्यंतच्या सौंदर्याचा आणि दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. तिने छोट्या पडद्यापासून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मृणाल ठाकर सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मृणाल ठाकूरने अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीबाबत केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे.
विराट कोहलीवर वेड्यासारखं प्रेम करते ‘ही’ अभिनेत्री
मृणालने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती विराट कोहलीवर खूप प्रेम करते. आता मृणाल ठाकूरने या प्रकरणावर पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. मृणालने एकदा सांगितलं होतं की, एकेकाळी ती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. तिचं हे जुनं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं असून ते व्हायरल होत आहे. इंस्टंट बॉलिवूड इंस्टाग्राम पेजवर यासंबंधित पोस्ट व्हायरल झाल्यावर मृणाल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मुलाखतीत केला होता खुलासा
अभिनेत्री मृणाल ठाकूर ही अभिनेता शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ या चित्रपटात झळकली होती. जर्सी हा क्रिकेटवर आधारित चित्रपट असून या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मृणाल ठाकूरनं सांगितलं होतं की, एक वेळ होती, जेव्हा विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती. मात्र, हे वक्तव्य आता पुन्हा व्हायरल होताच मृणालने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“माझं विराट कोहलीवर जीवापाड प्रेम”
या जुन्या वक्तव्यात मृणाल ठाकूर म्हणाली होती की, “मी क्रिकेट सुपरस्टार विराट कोहलीच्या प्रेमात वेडी आहे.” तिची ही मुलाखत खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, यावेळी विराट कोहलीच्या कटआउटसोब मृणाल ठाकूरचा फोटो असलेली पोस्टही रेडिटवर शेअर करण्यात आली होती, ज्याने चाहत्यांचं लक्ष वेधलं होतं.
“आता हे थांबवा”
विराट कोहलीबाबत मृणाल ठाकूरने केलेलं हे जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं आहे. यावर लोक जोरदार कमेंट करत होते. आता मृणाल ठाकूरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरलच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना तिने कमेंट करत लिहिलं आहे, “आता हे थांबवा”. यावरुन हे स्पष्ट होत आहे की, जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल झाल्यामुळे मृणाल संतापली आहे.