आरोग्यताज्या बातम्या

Helth Tips : गूळ- तूप खाण्याचे ८ जबरदस्त फायदे! वय वाढलं तरी त्वचा दिसेल तरुण- तब्येत राहील ठणठणीत

आपल्या स्वयंपाक घरातच असे काही पदार्थ असतात जे आपलं सौंदर्य खुलविण्यासाठी तसेच तब्येत उत्तम ठेवण्यासाठी मदत करत असतात. पण तरीही आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि वरवरच्या गोष्टींना प्राधान्य देतो. आता हेच बघा ना, सगळ्यांच्या स्वयंपाक घरात गूळ आणि तूप हे दोन पदार्थ असतात. पण खूपच कमी लोक ते नियमितपणे खातात. हे दोन पदार्थ जर एकत्र करून खाल्ले तर ते तुमच्या त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर ठरते.

 

 

गूळ आणि तूप एकत्र करून खाण्याचे फायदे

दररोज एका वाटीमध्ये १ टीस्पून गूळ आणि १ टीस्पून तूप घ्या. दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि नंतर ते खा.. असं खाल्ल्याने त्वचेला कोणते फायदे होतात ते पाहूया..

१. त्वचेवरचे पिगमेंटेशन, पिंपल्स, ॲक्ने कमी होतात.

२. वाढत्या वयासोबत त्वचा सुरकुतते तसेच सैलसर पडल्यासारखी होते. हा त्रास कमी करण्यासाठीही गूळ- तूप एकत्र करून खाणे उपयुक्त ठरते. कारण त्यामुळे एजिंग प्रोसेस हळूवार होते.

३. गूळ- तूप एकत्र करून खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

 

गूळ आणि तूप एकत्र करून खाण्याचे अन्य फायदे

१. शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

२. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत होते.

३. हाडे मजबूत होतात.

४. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठीही गूळ- तूप एकत्र करून खाणे फायद्याचे ठरते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button