आज दिघंचीत नागपंचमी निमित्त भव्य कुस्त्यांचे आयोजन! प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास २,५१,००० रुपयांचे बक्षीस
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे सत्कारमूर्तीच्या रुपात उपस्थित राहणार

माणदेश एक्सप्रेस न्युज : दिघंची : दरवर्षीप्रमाने ह्या वर्षीदेखील दिघंची गावामध्ये नागपंचमी व श्रीयाळ षष्टी निमित्त शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी म्हणजे आज भव्य कुस्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमासाठी सांगलीचे खासदार विशाल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा, जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, दिघंची गावच्या सरपंच लोकनियुक्त माधुरी मोरे, माजी सरपंच अमोल मोरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास २,५१,००० रू.व सरपंच श्री चांदीची गदा भेट देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्ह्यांमधून नामवंत मल्ल या कुस्तीत सहभागी होणार आहेत. तसेच महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख हे सत्कारमूर्तीच्या रुपात उपस्थित राहणार आहे. खास महिलांसाठी होममिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.