Video : …. तर त्याला घरातून ओढून मारू ; माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचा इशारा..!
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आटपाडीत मोर्चा
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधम संग्राम देशमुख याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जर त्याला जामीन मिळाला तर, त्याला घरातून ओढून मारू असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दिला.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज आटपाडीकरांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. आटपाडीकरांनी बंद पाळून, तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, यु.टी जाधव, राजेंद्र खरात, शिवाजीराव (तात्या) पाटील, पृथ्वीराज पाटील, अनिता पाटील, गुलशन वंजारी, नितीन कुलकर्णी, स्नेहजीत पोतदार, अरुण वाघमारे , चंद्रकांत दौंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
आटपाडी शहरात जीम चालविणाऱ्या संग्राम देशमुखने एका अल्पवयीन मुलीस चारचाकी गाडीतून पळवून धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्य आटपाडीकरांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा सर्व व्यापारीपेठेत शुकशुकाट होता. सकाळी १०.३० वाजता हा मोर्चा निघाला.मोर्चात महाविद्यालयीन मुली,युवक,महिला आणि पुरुष मोठया संख्येने सहभागी झाले होते.
पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख (Rajendranna Deshmukh) म्हणाले, महिलांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही. अत्याचार करणाऱ्यास चौकाचौकात फोडून काढा. गुन्हेगार कोणत्याही जातीचा असला तरी दयामाया करू नका.
ब्रम्हानंद पडळकर म्हणाले, गुन्हेगाराची धिंड काढा. अशा प्रवृत्तीस पाठींबा देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. गुन्हेगारांना कस्टडीत वेगळी वागणूक दिल्यास पोलीस अडचणीत येतील असा इशारा देत, खटला जलद न्यायालयात चालवून आरोपीस फाशी देण्याची मागणी त्यांनी केली. मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक, महिला, शालेय मुली उपस्थित होत्या.
माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा