आटपाडी

आटपाडीच्या सुपुत्राचा शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मान

सदरचा पुरस्कार हा पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी गावाचे ‘बार्डो’ या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सिनेमाचे दिग्दर्शक भिमराव मुढे यांना चित्रपट सृष्टीतील योगदाना ब‌द्दल या वर्षीचा शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव २०२४ (दिग्दर्शक विभाग) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार हा पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

भिमराव मुढे यांनी मराठी बरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे. ते आज चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक, व अभिनेतते आहेत. राष्ट्रीय पुरस्काराने  भिमराव मुढे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘स्व.दादा कोंडके स्मृति गौरव सन्मान २०२४’ हा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

भिमराव मुढे यांच्या घरात चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नाही; पण महाविद्यालयीन जीवनात नाटक, चित्रपटांवर त्यांचे प्रेम जडले आणि हेच करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या क्षेत्रात त्यांचा कोणीही ‘गॉडफादर’ नाही. चांगले चित्रपट करण्यासाठी किंवा चित्रपटसृष्टीत येण्यासाठी गॉडफादर नसल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button