तळेवाडीत वैभवदादा पाटील यांनी साधला नागरिकांशी संवाद
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तळेवाडी येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तळेवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नागरिकाशी संवाद साधताना वैभवदादा पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यात प्रचंड उत्साहात स्वागत होत आहे. लोकांच्या मध्ये माझ्याबद्दल प्रचंड प्रेम, आपुलकी आहे. येणाऱ्या काळात परिवर्तनाची लढाई सुरू असून या लढाईत आणि सर्वांगीण विकासासाठी आपण या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
तळेवाडी येथे मोठ्या उत्साहात वैभवदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वैभवदादा पाटील यांनी उपस्थित जेष्ठ नागरिक, तरुण-तरुणी, महिला-भगिनी यांच्याशी संवाद साधला तसेच तुमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या,असे आवाहन केले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.