आटपाडी : कौठूळी येथील एकास एक कोटी ८० लाख सोन्याच्या फसवणूक प्रकरणी अटक
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : केरळ राज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यावर हॉलमार्क करण्यासाठी दिलेले सोन्याच्या एक कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी केरळ पोलिसांनी आटपाडी तालुक्यातील विश्वास रामचंद्र कदम या संशयितास भिवघाट येथे अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील संशयित विश्वास कदम याचे केरळ राज्यात सोन्याचे दागिनेवर हॉलमार्क करण्याचे दुकान आहे. त्यामध्ये त्याची पत्नी स्नेहल कदम व इतर दोघे पार्टनर आहेत. गुन्हयातील फिर्यादी यांनी आरोपी विश्वास कदम यांना दोन किलो २५५.४० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजारभावाने किंमत १ कोटी ८० लाख रुपये होते.
फिर्यादीने हॉलमार्क करीता संशयिताकडे दिले असता संशयित आरोपींने ते विश्वासाने स्वतः जवळ ठेवुन घेवुन हॉलमार्क करुन ते फिर्यादीस परत न देता ते घेवुन पळुन गेला होता. याबाबत फिर्यादीने केरळ येथे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या तपासाचे अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी केरळ येथील पोलीस पथक सांगली येथे आले होते.
पोलीस पथकास गुन्हयातील फरार संशियत विश्वास रामचंद्र कदम हा मिवघाट येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने तेथे जावुन त्यास ताब्यात घेण्यात आले. संशयिताकडे गुन्हयाचे अनषंगाने विचारपुस करता त्याने या गुन्हयाची कबुली दिली असुन मुद्देमाल त्यांने त्रिशुर, केरळ येथेच विकला असलेबाबत कबुली दिली. याला पुढील तपास कामीसंशियतास केरळ पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.