आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. २ मधून सावित्री दत्तात्रय नरळे यांचा विजय

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीसाठी दिनांक ०२ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज (दि. २१) तहसीलदार कार्यालय, आटपाडी येथे शांततेत व नियोजित पद्धतीने पार पडली. या मतमोजणीत प्रभाग क्रमांक २ मधून शिवसेनेच्या उमेदवार सावित्री दत्तात्रय नरळे यांनी विजय मिळवून आपला दबदबा सिद्ध केला.
त्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात जल्लोष पाहायला मिळाला.
प्रभाग क्रमांक २ साठी यंदा चौरंगी लढत रंगली होती. शिवसेनेच्या सावित्री दत्तात्रय नरळे यांना ४८४, भाजपच्या शुभांगी अर्जुन गवंड यांना ३११, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ज्योती कैलास नरळे ५० तर अपक्ष रोहिणी राहुल लवटे यांना २२ मते मिळाली. सावित्री नरळे यांनी विजय मिळवला.
विजयानंतर बोलताना सावित्री नरळे यांनी प्रभागातील मतदारांचे आभार मानले. “हा विजय सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाचा आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज व मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम करणार आहे,” असे त्यांनी सांगितले.



