जगभरात विक्रम रचलेला प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट लवकरच ओटीटीवर पाहता येणार
बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट ओटीटीवर धडकणार आहे. ‘कल्की 2898 एडी’च्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कल्कि चित्रपट अनेकांनी थिएटरमध्ये पाहिला, पण अनेकांना हा चित्रपट अद्यापही पाहता आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षक याच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. त्याशिवाय, अनेकांना हा चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे निर्मात्यांनी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपवली आहे.
या दिवशी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार
‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘कल्की 2898 एडी’ ओटीटी (OTT) रिलीजची प्रतीक्षा आता संपणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. ‘कल्की 2898 एडी’ दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहिर केली आहे. कल्कि 2898 एडी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 22 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
कथाकथनाच्या सीमा ओलांडणारा चित्रपट
या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. अभिनेता प्रभासनेही याबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, ‘कल्की 2898 एडी हा कथाकथनाच्या सीमा ओलांडणारा चित्रपट आहे. नेटफ्लिक्सवर या चित्रपट पाहण्याचा अनुभव जगभरातील प्रेक्षकांसाठी मी प्रोत्साहित करत आहे’. अशी प्रभासने म्हटलं आहे.
कल्कि 2898 एडी चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई
‘कल्की 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलंच गाजवलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी बॉक्स ऑफिसवर इतकी रेकोर्डब्रेक कमाई कोणत्याही चित्रपटाला करता आली नाही. काही मोजकेच चित्रपट हिट ठरले. ‘कल्की 2898 एडी’ने सर्व उणिवा एकत्र भरून काढल्या आहेत. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 20 व्या दिवशी म्हणजे मंगळवारी तिकिटबारीवर ‘कल्की’चा जोर दिसून आला.