खानापूर : घानवडच्या उपसरपंचाचा गळा चिरून खून : घटनेने खानापूर तालुका हादरला
माणदेश एक्सप्रेस न्युज : विटा : खानापूर तालुक्यातील घानवड गावाचे माजी उपसरपंच व सोने-चांदीचे व्यवसायिक असलेले बापूराव चव्हाण यांचा आज दिनांक ०५ रोजी घानवड-गार्डी रस्त्यावर अज्ञातांनी गळा चिरून खून केला. या घटनेमुळे खानापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बापूराव चव्हाण हे घानवड गावाचे माजी उपसरपंच आहेत. त्याच बरोबर सोने-चांदी व्यवसायिक असून त्यांचे विटा येथे सोनारसिद्ध या नावाने ज्वेलर्स आहे. ते आज दिनांक ०५ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या गार्डी परिसरातील असलेल्या पोल्ट्रीकडे निघाले होते.
यावेळी याठिकाणी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी बापूराव चव्हाण यांच्यावर हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा गळा चिरला. यावेळी त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यावेळी या ठिकाणीहून जाणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती विटा पोलीसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस उपाधीक्षक विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीसांनी सदर घटनेची माहिती घेत असून, हल्लेखोरांच्या तपासणीसाठी पथक नियुक्त केले असून, या घटनेने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.