आटपाडी : आमदार गोपीचंद पडळकरांनी मतदानाचा हक्क बजावला ; नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : विधानपरिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपला मतदानाला हक्क बजावला. आम. पडळकर यांनी त्यांच्या गावी पडळकरवाडी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. ते जत विधानसभेमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी लवकर मतदान केंद्रात हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला. गोपीचंद पडळकर हे जत विधानसभेसाठी भाजपच्या तिकीटावर लढत आहेत. याठिकाण त्यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार तम्मन गौडा रवी पाटील यांच्याबरोबर होत आहे.
तर खानापूर विधानसभेसाठी शिवसेनेकडून सुहास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस कडून वैभव पाटील तर अपक्ष म्हणून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यात लढत होत आहे. सध्या तरी तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने याठिकाणी लढत ही रंगतदार होणार हे मात्र नक्की