‘भाजपच्या एक दोन आमदारांनी मंदिराच्या जमिनी लाटल्या’- जयंत पाटील
हिंदू देवस्थानांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जमिनी दिल्या गेल्या आहेत. परंतु भाजपच्या एक दोन आमदारांनी मंदिराच्या जमिनी लाटल्या आहेत. या जमिनी घेताना नजराणा भरायचा असतो. परंतु त्यांनी ५० टक्के नजराणा भरला. हा विषय मी दोन वेळा विधानसभेत काढला. आता परवा नजराण्याची रक्कम कमी केली आहे. महाराष्ट्रात हिंदू देवस्थानाच्या जमिनी विकण्याचे पाप भाजपकडे जात आहे. या जमिनीसंदर्भात कोर्टात तक्रारी गेल्या आहेत. सरकारकडून हिंदूच्या मंदिरांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच मंदिराच्या जमिनी लाटत आहेत. मंदिराच्या जमिनी लाटण्याचे काम भाजपने केले आहे. देवस्थानच्या जमिनी बिल्डराच्या ताब्यात दिल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारचा लुटालुटीचा कारभार सुरु आहे, असा घाणाघाती हल्ला भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला.
४०० पारचा नारा केला, पण…
महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. महाराष्ट्र सरकार हे घाबरलेले सरकार आहे. त्यांना निवडणुकीची भीती आहे. ते प्रत्येक निवडणुकीला घाबरत आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी जसे काम केले आहे, त्यामुळे ते धास्तावले आहेत. निवडणूक ऑक्टोंबरमध्ये घेण्याचे धाडस ते करणार नाहीत. ते दिवाळी झाल्यानंतरच निवडणुका घेणार आहेत. लोकसभेत ४०० पारचा नारा केला, पण ते २४० जागांवर थांबले. त्यांना बिहार आणि आंध्र प्रदेशाचा टेकू मिळाले. परंतु ते पलटी मारु लोक आहेत. हे सरकार कधी खाली येईल, त्याचे नेम नाही. फक्त आता सहा वर्ष की एक वर्ष हे बाकी आहे.