आटपाडी तालुक्यातील “या” गावाला जाणारा चारही बाजूंचा रस्ता खड्डेमय ; लोकप्रतिनिधींचे दुलर्क्ष ; एसटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
अन्यथा निवडणुकावर बहिष्कार घालण्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील जांभूळणी गावाला जोडणारे रस्ते चारही बाजुंनी नादुरुस्त झाले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यातून चारचाकी व दुचाकी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने या मार्गावरून धावणारी एसटी बस देखील या खराब रस्त्यामुळे बंद झाली असल्याने विद्यार्थी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. गावाला जोडणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत अन्यथा निवडणुकावर बहिष्कार घालण्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभूळणी हे गाव वसले आहे. गावाला जोडण्यासाठी मुढेवाडी-जांभूळणी, घाणंद-जांभूळणी, घरनिकी-जांभूळणी, झरे-जांभूळणी असे चारही बाजुंनी रस्ते आहेत. परंतु सर्वच बाजूचे रस्ते खड्डेमय झाले असून, या रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना प्रवास करत असताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे असल्याने याठिकाणी चारचाकी वाहन देखील जात नाही. या खराब रस्त्यामुळे आटपाडी आगाराची एसटी देखील प्रशासनाने बंद केली आहे.
जांभूळणी गावातून शिक्षणासाठी झरे, आटपाडी, खरसुंडी, घाणंद गावामध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने जात असतात. परंतु रस्ते खराब झाले असल्याने या मार्गावरून जाणारी एसटी बंद झाली असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, याला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून केला जात आहे.
.
जांभूळणी गावाला चारही बाजूला जोडले गेलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करून, एसटी बस पुन्हा चालू करावी. विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.
तर निवडणुकावर बहिष्कार
जांभूळणी गावाला येणारे सर्व रस्ते हे नादुरुस्त झाले आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून, साईटपट्या उखडल्या गेल्याने, रस्त्यावरील डांबर नाहीसे झाले असून, नावालाच रस्ते राहिले आहेत. यामुळे गावामध्ये येणारे एसटी देखील बंद झाली असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शालेय नुकसान होत असल्याने, रस्ते तात्काळ दुरुस्त करून एसटी बस चालू झाली पाहिजे अन्यथा निवडणुकांच्या बहिष्कार घालणार.
श्री. महादेव मासाळ
मा. चेअरमन विकास सोसायटी जांभूळणी