ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषि विभागाच्या राजपत्रित जागा राज्यसेवा पूर्व परिक्षेत समावेश करा : आम. गोपीचंद पडळकर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी

कृषि विभागने आणि वित्त विभागने राजपत्रित कृषि सेवा पदभरतीची २५८ जागेची भरती २०२४ मध्ये करण्यासाठी मंजूरी दिली आहे.

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : कृषि विभागाच्या राजपत्रित जागा राज्यसेवा पूर्व परिक्षा २५ ऑगस्ट २०२४ च्या पदभरती मध्ये समाविष्ट कराव्यात अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी दिले आहे.

कृषि विभागने आणि वित्त विभागने राजपत्रित कृषि सेवा पदभरतीची २५८ जागेची भरती २०२४ मध्ये करण्यासाठी मंजूरी दिली आहे. राजपत्रित कृषी जागा संदर्भातील काम प्रशासकिय पातळीवर कृषी विभाग, वित्त विभाग ने मान्यता दिली आहे.आता फाईल वित्त विभाग मध्ये असुन सामान्य प्रशासन विभाग जीएडी कडे पाठविण्यात यावा. तसेच मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना निर्देश देऊन सदर वरील पदभरती राजपत्रित कृषी सेवा २०२४ ही पदे याच वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजीत असलेल्या परिक्षमध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

कृषी विभागाने गेल्या वर्षी २०२३ या वर्षात एकही जागा भरली नव्हती. २०२१ आणि २०२२ या वर्षात निवड झालेल्या उमेदवारांना अजुनही नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत. सदर पदभरतीची जाहीरात यावर्षीच्या २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पदभरतीत आली नाही. तर खुल्या प्रवर्गात असणारे उमेदवार ज्यांना पदभरतीसाठी इतर संवर्गापेक्षा कमी वयोमर्यादा शासनाने दिली आहे. त्यांचे वय उलटून जाईल अशा जवळपास ४० ते ५० हजार गरीब शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधारकावर अन्याय होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात परीक्षा झाली नाही. त्यामुळे त्यांना किमान एक संधी देऊन त्यामध्ये ही पदे भरण्यात यावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button