आटपाडी : शेटफळे गावाची मान उंचावली ; महेशची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
राज्यात त्याने २६ वा रँक मिळावत यश संपादन केले आहे

माणदेश एक्सप्रेस : आटपाडी : राज्यसेवा परीक्षांचा नुकताच निकाल लागला असून यामध्ये शेटफळेच्या सुपुत्राने यश मिळविले आहे. महेश अशोक गायकवाड याने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
राज्यात त्याने २६ वा रँक मिळावत यश संपादन केले आहे. महेश गायकवाड याचे प्राथमिक शिक्षण शेटफळे येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण भवानी हायस्कूल येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण आबासाहेब खेबुडकर ज्युनि. कॉलेज, आटपाडी येथे झाले आहे.
माध्यमिक शिक्षणानंतर महेश गायकवाड याने पदवीचे शिक्षण कराड येथील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज येथून पूर्ण केले. महेशचे वडील हे आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात शिक्षक म्हणून कार्यरत होते. महेशन जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळत आपल्या आई वडिलांचे नाव मोठे केले आहे. महेशच्या यशाने शेटफळे गावासह संपूर्ण तालुक्यातील त्याचे अभिनंदन होत आहे.