आटपाडी : पारधी समाजातील युवती बनली लिपिक ; अमरसिंह देशमुखांनी दिला पारधी समाजाला न्याय
खरे तर, पारधी समाज आणि शिक्षण या दूर-दूर पर्यंत कोणताही संबंध नाही. शिक्षणापासून हा समाज नेहमीच वंचित राहिला असला तरी, व्यवस्थेने देखील त्याला शिक्षण नाकारले हे वास्तव आहे.
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पारधी समाजातील युवतीला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या प्रयत्नाने हायस्कूल मध्ये लिपिक बनण्याची संधी मिळाली. यामुळे प्रथमच शिक्षणापासून व गावकुसापासून कोसो दूर असणाऱ्या असणाऱ्या पारधी समाजाला न्याय मिळाला आहे.
आटपाडी तालुक्यात ‘आटपाडी एज्यूकेशन सोसायटीच्या’ माध्यमातून स्व. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी शिक्षणाची गंगा दारोदारी पोहचवली. आटपाडी तालुका जरी दुष्काळी असला तरी, तालुक्यामध्ये शिक्षणामध्ये मात्र कधीच दुष्काळ जाणवला नाही. हे स्व. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांचे कार्य कोणालाही पुसता येणार नाही.
स्व. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या नंतर हीच धुरा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पुढे नेटाने चालवली व त्याचा विस्तार मुंबई पर्यंत केला असला तरी, समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंतील विद्यार्थ्यांला शिक्षण मिळाले पाहिजे याची देखील त्यांना जाण होती.
खरे तर, पारधी समाज आणि शिक्षण या दूर-दूर पर्यंत कोणताही संबंध नाही. शिक्षणापासून हा समाज नेहमीच वंचित राहिला असला तरी, व्यवस्थेने देखील त्याला शिक्षण नाकारले हे वास्तव आहे. परंतु अमरसिंह देशमुख यांनी मात्र पारधी समाजातील वर्षा राजेंद्र पवार या मुलीला शिक्षण घे हे सांगतानाच तुला नोकरी सुद्धा देतो हे आश्वासन दिले होते.
अमरसिंह देशमुख यांनीही दिलेला शब्द पाळत संस्थेच्या गोमेवाडी हायस्कूल येथे वर्षा राजेंद्र पवार हिला लिपिक पदावर कायमस्वरूपी दिली असून यामुळे उपेक्षित, वंचित अशा पारधी समाजातील मुलीला विकासाच्या, प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणले. वर्षा पवार हिला मिळालेल्या नोकरीमुळे पारधी समाजातील कलंक पुसण्याचे काम थोड्या फार प्रमाणात कमी होईल.