आटपाडी
माळेवाडी येथे शिवसेनेचे पॅनल प्रमुख अनिल काशिनाथ चव्हाण यांचा वैभव दादा पाटील गटात जाहीर प्रवेश
माणदेश एक्सप्रेस : आटपाडी / प्रतिनिधी : माळेवाडी येथे शिवसेनेचे पॅनल प्रमुख अनिल काशिनाथ चव्हाण यांनी वैभव पाटील गटात जाहीर प्रवेश केला.
खानापूर-आटपाडी मतदारसंघाचा समतोल विकास करण्याची क्षमता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा पाटील यांच्याकडे असल्याने आपण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असे प्रतिपादन माळेवाडी (आटपाडी) येथील कार्यकर्ते अनिल काशिनाथ चव्हाण यांनी केले.
वैभव दादा पाटील यांना भेटून पाटील गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी मनोहर जाधव मेजर साहेब एम पी पवार, प्रशांत पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.